World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी श्रीलंका पात्र
SL vs ZIM, Match Report : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी श्रीलंका संघ पात्र ठरला आहे.
SL vs ZIM, Match Report : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी श्रीलंका संघ पात्र ठरला आहे. क्वालिफायरच्या सुपर -6 फेरीत श्रीलंका संघाने आज झिम्बाब्वेचा पराभव करत आपलं स्थान निश्चित केले आहे. वेस्ट इंडिज संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी पात्र होणारा दुसरा संघ कोणता? यासाठी चूरस पाहायला मिळणार आहे. झिम्बाब्वे हा प्रबळ दावेदार आहे. पण नेदरलँड आणि स्कॉटलँड हे संघही स्पर्धेत आहेत.
सुपर 6 च्या फेरीत आज झालेल्या सामन्यात श्रीलंका संघाने झिम्बाब्वेचा 9 विकेटने दारुण पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 165 धावांपर्यंत मजल मारली होती. श्रीलंका संघाने हे आव्हान 32.1 षटक आणि एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना 32.2 षटकात 165 धावांपर्यंत मजल मारली होती.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली. झिम्बाब्वेकडून कर्णधार सीन विलियम्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सीन विलियम्स याने 57 चेंडूत 6 चौकर आणि एका षटकाराच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. कर्णधाराचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकेकडून महीश तीक्ष्णा सर्वात यशस्वी गोलंदाज ठऱला. त्याने 8.2 षटकात 25 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. त्याशिवाय दिलशान मधुशंका याला तीन विकेट मिळाल्या. महीथा पथिराना याने 2 फलंदाजांना तंबूत धाडले. कर्णधार दासुन शनाका याने एक विकेट घेतली. दमदार कामगिरी करणाऱ्या महीश तीक्ष्णा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Sri Lanka have taken one place, but there's one more up for grabs at #CWC23 👀
— ICC (@ICC) July 2, 2023
Scenarios for each team 👇https://t.co/DLG3xdGY3d
पथूम निशंका याचे नाबाद अर्धशतक -
झिम्बाब्वेने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेनं दमदार सुरुवात केली. श्रीलंकेनं 32.1 षटकात एक विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले. सलामी फलंदाज पथूम निशंका याने शानदार शतकी खेळी केली. निशंका याने 102 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली, यामध्ये 14 चौकारांचा पाऊस पाडला. कुसल मेंडिस याने 42 चेंडूवर नाबाद 25 धावांचे योगदान दिले. दिमुथ करूणारत्ने याने 56 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नगारवा याला एकमेव विकेट मिळाली.
भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी थेट पात्र होणारे 8 संघ कोणते ?
1. न्यूझीलंड 2. इंग्लंड 3. भारत 4. ऑस्ट्रेलिया 5. पाकिस्तान 6. दक्षिण अफ्रीका 7. बांगलादेश 8. अफगानिस्तान