India vs Pakistan, World Cup 2023 : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हल्ल्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवला होता. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी स्टेडिअमची सुरक्षा वाढवली आहे. भारत पाकिस्तान सामन्याआधी स्टेडिअम उडवून देऊ अशी धमकी देणारा मेल आला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. धमकीला घाबरण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांना धमकीचा ईमेल आला होता. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधानांना इजा करण्याची आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी दिली होती. पाठवणाऱ्याने 500 कोटी रुपये आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची तुरुंगातून सुटका करण्याची मागणीही त्या मेलद्वारे केली होती.


अतिरिक्त पोलीस आयुक्त चिराग कोराडिया यांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. शनिवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने असतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीला घाबरण्याची गरज नाही. 


कोराडिया म्हणाले की, इतर सामन्याच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पाच ऑक्टोबर रोजी झालेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था कडेकोठ होती. वाहने, हॉटेल, ढाबा यासह गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने नजर होती. प्रेक्षकांच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. 


कोराडिया म्हणाले की, 'घाबरण्याची गरज नाही, कारण, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थित आणि कडेकोट केली आहे. कोणत्याही धमकीला अहमदाबाद पोलीस सक्षमपणे तोंड देईल. 11 ऑक्टोबरपासून सुरक्षा व्यवस्था सुरु होईल. आम्ही पूर्णपणे तयार आहोत. स्टेडियमच्या गेटवर बंदोबस्त ठेवला जाईल, वाहने, हॉटेल्स, गेस्ट हाऊसची तपासणी केली जाईल आणि समाजकंटकांवर नजर ठेवली जाईल. ' 


आणखी वाचा :


IND vs AUS : कांगारुची कोंडी करण्यासाठी अश्विन मैदानात उतरणार, चेन्नईच्या मैदानावर किती मोठा गेम चेंजर ठरणार


IND vs AUS : रोहित-स्टार्क ते वॉर्नर-अश्विन, आजच्या सामन्यात या खेळाडूंमध्ये लढत, कुणाचा विजय होणार? 


दक्षिण आफ्रिकेकडून कांगारुच्या विक्रमाला सुरुंग, 2015 चा मोठा विक्रम मोडला, भारतही यादीत