Pakistan Cricket Team : बाबार आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली होती. पाकिस्तान संघाने टॉप 4 मध्ये स्थानही पटकावले होते. पण पाकिस्तान संघाला दोन मोठ्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे सेमीफायनलमध्य पोहचणं कठीण झालेय, पण अद्याप आशा कायम आहेत. पाकिस्तानला भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचा रनरेट घसरला. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर ते टॉप 4 च्या स्पर्धेतून बाहेरही फेकले गेले. पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी काय करावे लागले, याबाबत जाणून घेऊयात... 


बाबर आझमच्या पाकिस्तान संघाला आतापर्यंत चार सामन्यात दोन विजय आणि दोन पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान संघाचे चार गुण आहेत. पाकिस्तान संघाचे अद्याप पाच सामने शिल्लक आहेत.  पाकिस्तान संघाला कोणत्याही अडथळ्याशिवाय सेमीफायनलममध्ये पोहचायचं असल्यास उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. असे केल्यास पाकिस्तान संघाचे 14 गुण होतील. त्याशिवाय पाकिस्तान पाकिस्तान संघाने पाचपैकी चार सामने जिंकले तरही ते सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात. पण त्यांना इतर संघावर आणि रनरेटचाही प्रश्न असेल. 


सेमी-फायनलमध्ये कसा जाणार पाकिस्तान -


पाकिस्तान संघाने पाचपैकी चार सामने जिंकले... तर त्यांचे 12 गुण होतील.. 12 गुणांसह सेमीफायनलमध्ये जाणं कठीम आहे. इतर संघाच्या कामगिरीवर त्यांचे सेमीफायनलचे तिकिट अवलंबून असेल. त्याशिवाय रनरेटही चांगला करावा लागणार आहे. पाकिस्तान संघ उर्वरित पाच सामने कसे खेळतात, यावर त्यांचा सेमीफायनलचे तिकिट अवलंबून आहे. पाकिस्तान संघाचा पुढील सामना अफगाणिस्तानविरोधात चेन्नईमध्ये होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानला मोठा विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरोधात पाकिस्तान संघाला खेळायचे आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संध्या भन्नाट फॉर्मात आहेत. त्यांचा पराभव करणं पाकिस्तानला सहजासहजी शक्य नाही. या दोन सामन्यावरच पाकिस्तानचे सेमीफायनलचे तिकिट अवलंबून आहे.  त्याशिवाय गतवेळचा विजेता इंग्लंड संघही पाकिस्तानसमोर तगडे आव्हान उभे करेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याकडून पाकिस्तानला सावध राहावे लागणार आहे. पाकिस्तान संघाला पाचपैकी तीन सामने मोठ्या संघाविरोधात खेळायचे आहेत. त्यावरचं त्यांचे सेमीफायनलचे तिकिट अवलंबून आहे. 


पाकिस्तान संघ सध्या सरासरी कामगिरी करत आहे. गोलंदाजीमध्ये शाहीन आफ्रिदी फॉर्मात परतलाय. पण इतर गोलंदाजाकडून हवी तशी मदत मिळत नाही. फिरकी बाजू अतिशय कमकुवत असल्याचे दिसतेय. त्याशिवाय कर्णधार बाबर आझमही फॉर्मात नाही. लोअर मिडल ऑर्डरही फ्लॉप जातोय. पाकिस्तान संघाला पाच सामन्यात विजय मिळवायचा असेल तर खेळ उंचावावा लागणार आहे.