एक्स्प्लोर

World Cup 2019 Ind Vs SA | भारताची विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेवर 6 विकेट्सनी मात

टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात 128 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं आहे. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे तेविसावं आणि विश्वचषकातलं दुसरं शतक ठरलं.

world cup 2019 : टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या तूफान गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात करत 228 धावांचं लक्ष्य पार केलं. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात 128 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे तेविसावं आणि विश्वचषकातलं दुसरं शतक ठरलं. या सामन्यात भारतीय विजयाच्या आशा या रोहितवरच केंद्रित झाल्या होत्या. रोहित 122 धावांवर नाबाद राहिला. रोहित आणि धोनी या जोडीने विजयासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. कोहली अवघ्या 18 धावांवर बाद झाला, तेव्हा टीम इंडिया दोन बाद 54 धावांवर होती. विकेटकीपर क्विंटन डी कॉकने कर्णधाराचा झेल घेतल्यानंतर उपकर्णधार रोहित शर्मावरच सर्व मदार होती. World Cup 2019 Ind Vs SA | भारताची विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेवर 6 विकेट्सनी मात याआधी, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 227 धावांत रोखून विश्वचषक सामन्यावर वर्चस्व मिळवल्याचं चित्र दिसत होतं. भारताकडून युजवेंद्र चहलने चार, जसप्रीत बुमराने आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादवने एक विकेट काढली. बुमराहने चौथ्या आणि सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना तंबूत पाठवलं. सहाव्या षटकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेची स्थिती दोन बाद 24 अशी झाली होती. कर्णधार फाफ डू प्लेसिसने डुसेनच्या जोडीने 54 धावांची भागिदारी रचली होती, मात्र चहलने दक्षिण आफ्रिकेचं डाव सावरण्याचं स्वप्न भंग केलं. चहलने एकाच षटकात दोघा फलंदाजांना माघारी धाडलं. साऊदम्पटनमधल्या रोज बाऊल स्टेडियमवर टीम इंडियाचा सलामीचा सामना रंगला. दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या विश्वचषकातला हा सलग तिसरा पराभव ठरला. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र विजयाचं खातं उघडण्याचं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न अधुरंच राहिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
×
Embed widget