Women’s Premier League 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामाला नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. या T20 लीगचा पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात होत आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली असून गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. 






WPL ची पहिली आवृत्ती सुरू होण्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, जी प्रतिक्षा आता जवळपास संपली आहे. ओपनिंग सेरेमनीनंतर आता पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्स महिला संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.  तर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू बेथ मुनी गुजरात जायंट्स संघाची कर्णधारपदी विराजमान आहे. जर दोन्ही संघांबद्दल बोलायचं झालं तर त्यात उत्कृष्ट महिला खेळाडूंची नावे आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, ऍशले गार्डनर व्यतिरिक्त सोफी डंकले देखील गुजरात जायंट्स संघात खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या महिला संघात हेली मॅथ्यूजशिवाय नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर आजच्या सामन्यासाठीचे नेमके संघ पाहूया...


मुंबई इंडियन्सचा संघ 


यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, हीदर ग्रॅहम, अमनजोत कौर, हुमैरा काझी, पूजा बस्त्राकर , नीलम बिश्त, इस्सी वोंग, सायका इशाक, धारा गुजर, सोनम यादव, जिंतीमणी कलिता, क्लो ट्रायॉन


गुजरात जायंट्सचा संघ


बेथ मुनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सब्भिनेनी मेघना, हरलीन देओल, सोफिया डंकले, अॅश्लेग गार्डनर, अश्विनी कुमारी, दयालन हेमलता, स्नेह राणा, मानसी जोशी, तनुजा कंवर, मोनिका पटेल, हर्ले गाला, शबनम मोहम्मद शकील, पारुन, मोनिका पटेल. अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, सुषमा वर्मा, किम गर्थ


थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या या हंगामातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.


हे देखील वाचा-


WPL 2023 Schedule : महिला प्रीमियर लीग 2023 चं वेळापत्रक ते लाईव्ह स्ट्रीमिंग, A टू Z माहिती एका क्लिकवर