Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविकला (Natasa Stankovic) वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 4 मार्च 1992 रोजी सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशानं नुकतं ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा हार्दिकशी लग्न केलं होते. हार्दिक पांड्याने पत्नी नताशाला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना इन्स्टावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचे आणि नताशाचे अनेक अप्रतिम फोटो पोस्ट केले आहेत. दुसरीकडे, हार्दिकने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेबी.... तुझ्यावरील माझं प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे."


पाहा VIDEO-






ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याला संघाचं कर्णधारपद सांभाळावे लागणार आहे. त्यामुशे तो आपल्या पत्नीसोबत नाही तर टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत आहे, या एकदिवसीय मालिकेच्या तयारीसाठी एकदिवसीय मालिकेपूर्वी आयोजित केलेल्या शिबिराचा एक भाग आहे.


दुखापतीतून पुनरागमन करत हार्दिकने केलं स्वत:ला सिद्ध  


पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्याने मागील काही दिवसांत बॉल आणि बॅट या दोन्हीच्या मदतीने दमदार कामगिरी केली आहे. 2022 च्या आयपीएल हंगामात, गुजरात टायटन्सचा कर्णधार असताना, हार्दिकने आपलं नेतृत्व कौशल्य दाखवत त्यानं संघाला जिंकवून दिलं. तेव्हापासून भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही एकदिवसीय किंवा टी-20 मालिकेत खेळलेला नाही, तेव्हापासून हार्दिकने त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. हार्दिकची सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना केली जाते आणि आता प्रत्येकजण त्याच्या कसोटी फॉरमॅटमध्ये परतण्याची वाट पाहत आहे.


कोण आहे हार्दिकची पत्नी नताशा?


कोरोना काळात हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक लग्नबंधनात अडकले होते. नताशा स्टॅनकोविक बॉलिवूड अभिनेत्री आहे. नताशा ही सर्बियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून नताशानं बॉलिवूड डेब्यू केला होता. बिग बॉस सिझन 8 आणि रॅपर बादशाहच्या डिजे वाले बाबू मेरा गाना चला दे, या गाण्यातून नताशा प्रकाशझोतात आली होती. डान्स रिअॅलिटी शो नच बलिएमध्येही नताशा अली गोणीसोबत सहभागी झाली होती. 2012 मध्ये अभिनयात करिअर करण्यासाठी भारतात आलेल्या नताशाने शाहरुख खानच्या झीरो सिनेमातही छोटी भूमिका साकारली होती.


हे देखील वाचा-