WPL 2023  opening ceremony : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम आजपासून (4 मार्च, शनिवार) सुरू होत आहे. सामन्यापूर्वी शानदार उद्घाटन सोहळा आणि रंगतदार कार्यक्रम (wpl opening ceremony 2023) होणार आहे. पण या सगळ्यांआधी भारतीय महिला संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि अष्टपैलू हरलीन देओल प्रसिद्ध गायक अमृतपाल सिंग धिल्लन (एपी ढिल्लॉन)सोबत एका वेगळ्या अंदाजात दिसल्या. जेमिमा आणि हरलीनने एपी ढिल्लॉनसोबत खास गाणं गायलं.


महिला प्रीमियर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्स गिटार वाजवण्यासोबत गाताना दिसत आहे. उद्घाटन समारंभाच्या आधी एपी ढिल्लॉनने लॉकर रूममध्ये जेमिमा आणि हरलीन देओल यांची भेट घेतली. दिल्लीसाठी खेळणारी जेमिमा आणि गुजरातसाठी खेळणारी हरलीन देओल यांनी मिळून एपी ढिल्लॉनसोबत गाणं गायलं आहे. काही वेळातच एपी ढिल्लॉन यानेही आपल्या सुंदर आवाजाने या गाण्याला साथ दिली. यादरम्यान जेमिमा खूप छान गिटार वाजवताना दिसली. हा व्हिडीओ चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो चाहत्यांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.


पाहा VIDEO-






महिला आयपीएलचा पहिला सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. उद्घाटन समारंभ 6:25 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, चाहत्यांसाठी स्टेडियमचे दरवाजे 4:00 वाजल्यापासूनच उघडतील. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना सायंकाळी 8.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक 7:30 वाजता होईल. बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सॅनन उद्घाटन समारंभात परफॉर्म करतील आणि गायक एपी ढिल्लन आपल्या गाण्यांनी कार्यक्रमाला चैतन्य देईल.


कुठे पाहाल लाईव्ह टेलिकास्ट? 


महिला प्रीमियर लीगची ओपनिंग सेरेमनीचं लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स-18 1 आणि स्पोर्ट्स-18 1HD चॅनल्सवर पाहता येईल. या सेरेमनीची लाईव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमावरही उपलब्ध असेल. 


WPL मध्ये कोणत्या संघांचा समावेश? 


मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी झाले असून सर्व सामने नवी मुंबई आणि मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.


हे देखील वाचा-