Womens Asia Cup Winners List : भारत आणि श्रीलंका (India and Sri lanka) या दोन महिला संघामध्ये 2004 साली सुरु झालेला महिला आशिया चषक आता 7 देश खेळताना दिसत आहे. दरम्यान सर्वात पहिल्या अर्थात 2004 च्या आशिया चषकात श्रीलंका संघाला 5-0 ने मात देत भारताने कप जिंकला असून यंदा 2022 मध्येही अंतिम सामन्यात श्रीलंकेला 8 विकेट्सने मात देत भारतीय महिलांनीच आशिया चषक उंचावला आहे. विशेष म्हणजे आजवर झालेल्या आठ एडीशनमध्ये भारताने तब्बल सात वेळा कप जिंकत आपला दमदार वर्चस्व स्पर्धेवर ठेवलं आहे. केवळ एक वर्षी 2018 मध्ये बांग्लादेशने विजय मिळवला असून नेमकी आजवरची यादी कशी आहे, कोणत्या कर्णधाराने भारताला विजय मिळवून दिला आहे.तसंच कोणता संघ उपविजेता राहिला आहे ते पाहूया...

2004 पासून ते  2022 पर्यंत महिला आशिया चषक विजेत्यांची यादी-

वर्षफॉर्मेटविजेतानिकालउपविजेताठिकाण
2022टी20भारत8 विकेट्सने भारत विजयीश्रीलंकासिल्हेट
2018टी20बांग्लादेश3 विकेट्सने बांग्लादेश विजयीभारतक्वॉलालम्पूर
2016टी20भारत17 धावांनी भारत विजयीपाकिस्तानबँकॉक
2012टी20भारत18 धावांनी भारत विजयीपाकिस्तानगुवानगझु
2008एकदिवसीयभारत177 धावांनी भारत विजयीश्रीलंकाकुरुनेगाला
2006एकदिवसीयभारत8 विकेट्सने भारत विजयीश्रीलंकाजयपूर
2005-06एकदिवसीयभारत97 धावांनी भारत विजयीश्रीलंकाकराची
2004एकदिवसीयभारत5-0 च्या फरकाने भारत विजयीश्रीलंका कोलंबो

 

2004 पासून ते  2022 पर्यंत महिला आशिया चषक विजेत्या कर्णधारांसह मालिकावीरांची यादी-

वर्षविजेताकर्णधारप्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द सिरीज
2022भारतहरमनप्रीत कौररेणूका सिंहदिप्ती शर्मा
2018बांग्लादेशसलमा खातुनरुमाना अहमदहरमनप्रीत कौर
2016भारतहरमनप्रीत कौरमिताली राजमिताली राज
2012भारतहरमनप्रीत कौरपुनम राऊतबिस्मा मारुफ
2008भारतमिताली राजआशा रावतरुमेली धार
2006भारतमिताली राजसुनेत्रा परांजपेदेदूनू सिल्वा
2005-06भारतमिताली राजमिताली राज-
2004भारतममता मेबेनअंजू जैनअंजून चोप्रा

हे देखील वाचा-