IND W vs MLY W: महिला आशिया चषकात भारतीय महिला संघानं (India Women Cricket Team) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केलीय. सिल्हेट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet Outer Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतानं मलेशियाचा 30 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघानं 20 षटकात चार विकेट्स गमावून मलेशियासमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियानं 5.2 षटकांत 2 गडी गमावून 16 धावा केल्या. यानंतर पावसामुळं सामना होऊ शकला नाही आणि भारतानं डकवर्थ लुईसच्या नियमानुसार हा सामना 30 धावांनी जिंकलाय.
ट्वीट-
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं 20 षटकात चार विकेट्स गमावून मलेशियासमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतकडून मेघना सिंहनं सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. शेफाली वर्मानं 46 धावांचं योगदान दिलं. तर, ऋचा घोषनं 19 चेंडूत 33 धावांची स्फोटक खेळी केली. मलेशियाकडून दुराईसिंघम आणि नूर दानिया यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या.
भारताची भेदक गोलंदाजी
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मलेशियाच्या संघाची सुरुवात खराब झाली. मलेशियाच्या संघानं पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्या. कर्णधार दुराईसिंघम (0 धाव) आणि वान जूलिया (1 धाव) स्वस्तात बाद झाले. मलेशियाच्या संघ 5.2 षटकात 16 धावांवर असताना पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सामना थांबवण्यात आला. मलेशियाची मास एलिसा नाबाद 14 आणि एल्सा हंटर नाबाद एक धावा करून पव्हेलियनमध्ये परतली. भारताकडून दीप्ती शर्मा आणि राजेश्वर गायकवाड यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताचा 30 धावांनी विजय
पावसामुळं सामन्याच्या निकाल लागू शकला नाही. ज्यामुळं डेकवर्थ लुईसच्या नियमांतर्गत भारताला विजयी घोषित करण्यात आलं. आशिया चषकात भारताची सुरुवात चांगली झालीय. या स्पर्धेत भारतानं सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. या स्पर्धेत पुढील सामन्यांतही भारतीय महिला संघ चांगली कामगरी बजावेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
संघ:
भारतीय महिला संघ:
स्मृति मानधना, जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, स्नेह राणा, दयालन हेमलता, ऋचा घोष, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, राधा यादव.
मलेशिया महिला संघ:
एल्सा हंटर, नुरिल्या नतास्या, माहिरा इज्जती इस्माइल, साशा आजमी, ऐना हमीजा हाशिम, मास एलिसा, डब्ल्यूए दुराईसिंघम (कर्णधार), वान जूलिया, जे इंतान, ऐसा एलीसा, नूर दानिया स्यूहादा.
हे देखील वाचा-