Indian Bowlers in Death Overs : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने घेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियावरही टी20 मालिकेत विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) भारत चांगल्याप्रकारे सज्ज झाल्याचं दिसून येत आहे. पण अशातच भारतीय संघाची खरी डोकेदुखी ठरतेय डेथ बोलिंग खासकरुन 19 व्या षटकातील गोलंदाजी.


टी20 क्रिकेटमध्ये 20 व्या षटकापेक्षा महत्त्वाचं असणारा 19 वं षटक भारतीय गोलंदाजांना टाकणं अवघड पडतंय. टीम इंडियाचे बोलर्स 19 व्या ओव्हरमध्ये भरभरुन रन देत आहेत. त्यामुळे भारताला सामनेही गमवावे लागत आहेत. तर विजयासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मध्येही 238 धावांचे लक्ष्य देऊन भारताला सहज विजय मिळवता आला नाही. यावेळीही 19 व्या षटकात भारताने 26 रन दिले. मागील 8 सामन्यांचा विचार करता यातील 6 सामन्यांत भारताने 19व्या षटकात 36 चेंडूत 110 धावा दिल्या आहेत. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकात 19 वी ओव्हर भारतासाठी कोण करणार? हा मोठा प्रश्न भारतासमोर उभा ठाकला आहे.


बुमराहची दुखापत आणखी चिंतेत टाकणारी


भारतीय गोलंदाजीचा विचार करता मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर गेल्याच्या बातम्या येत आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर गेला आहे. तो आगामी टी20 विश्वचषकातही विश्रांतीवर असणार अशी माहिती समोर आली. त्यामुळे भारताचा मुख्य गोलंदाज बाहेर गेल्यास डेथ ओव्हर्समध्ये बोलिंगची चिंता वाढू शकते. त्यात युवा गोलंदाज अर्शदीपला (Arshdeep Singh) डेथ बोलिंग स्पेशलिस्ट म्हणून संघात घेतलं असलं तरी त्यानेही मागील काही सामन्यात बऱ्याच धावा दिल्या आहेत. दुसरीकडे संघातील अनुभवी भुवनेश्वर कुमारला तर 19 व्या षटकात बऱ्याच धावा जात असल्याने भारत विश्वचषकात काय करणार हा मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.


हे देखील वाचा-