South Africa tour of India: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) 22 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही सूर्यकुमार यादवनं विस्फोटक फलंदाजी केली होती. एवढेच नव्हेतर, कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो टॉपवर आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जलद 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही त्यानं स्थान मिळवलंय. मात्र, असं असतानाही भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सूर्यकुमार यादवला विश्रांती देण्याचा विचार करतोय. यामागचं कारणही  रोहित शर्मानं सांगितलं आहे. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी रोहित शर्माला सूर्यकुमार यादवचा फॉर्म कसा संभाळशील? असा प्रश्न विचारला. यावर रोहित शर्मा म्हणाला की, "सूर्यकुमार यादवला विश्रांती देण्यात यावी, असं मला वाटतंय. त्याला थेट 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरवण्याचा विचार करतोय. सूर्या सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याला प्रत्येक सामना खेळायचा. त्याची नेहमी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. याच गोष्टी त्याला आनंदात ठेवतात आणि आम्हालाही तो आनंदात राहावं अशी इच्छा आहे."


व्हिडिओ-






 


सूर्यकुमार यादवचा दमदार फॉर्म
सूर्यकुमार यादवनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सूर्यानं आतापर्यंत 33 टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 39.88 सरासरी आणि 177 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 हजार 37 धावा केल्या आहेत. ज्यात 9 अर्धशतक आणि एक शतकाचा समावेश आहे. 


भारताचा 16 धावांनी विजय
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या केएल राहुल, सूर्यकुमार यादवच्या अर्धशतक आणि कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांच विशाल लक्ष्य ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरनं ( नाबाद 106 धावा) शतक आणि क्विंटन डी कॉकनं ( नाबाद 69) अर्धशतक झळकावलं. पण त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकात तीन विकेट्स गमावून 221 धावा केल्या. या विजयासह भारतानं तीन सामन्याची टी-20 मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. 


हे देखील वाचा-