Womens T20 World Cup 2023 : नुकतीच अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शेफाली वर्माच्या (Shefali Verma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. ज्यानंतर आता भारतीय सीनियर महिला संघाचे खेळाडू महिला टी-20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) खेळण्यासाठी मैदानात उतरत आहेत. महिला खेळाडू स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवतील आणि ट्रॉफी जिंकतील अशी आशा वर्तवण्यात येत आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार असून स्पर्धेपूर्वी संघातील खेळाडूंनी खास फोटोशूट केलं आहे.

  


स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे.  याआधी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त इतर संघांच्या कर्णधारांनी फोटोशूटमध्ये भाग घेतला होता. याशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी देखील खास फोटो सेशन केलं. या फोटोमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरसह संघातील सर्व खेळाडू दिसत होत्या. या फोटोशूटमध्ये जेमिमा रॉड्रिग्सची वेगळीच स्टाईल पाहायला मिळाली. भारतीय संघातील महिलांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


पाहा फोटो-






पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल हरमनप्रीत काय म्हणाली?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला सामना 12 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. त्याचवेळी या सामन्यापूर्वी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठं वक्तव्य केलं आहे. ''हा महत्त्वाचा सामना आहे, मात्र आमच्या संघाचं लक्ष हा सामना जिंकण्यावर असेलचं पण आमचं अधिक लक्ष आयसीसी ट्रॉफीवर असणार आहे.'' असं कौर म्हणाली.


या विश्वचषकात 10 संघ सहभागी होत असून, त्यांना दोन गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील एक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. दोन्ही गटातील अव्वल 2-2 संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. 10 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान गट टप्प्यातील सामने खेळवले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.


गट-अ: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
गट-ब: भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज


हे देखील वाचा-