Commonwealth Games 2022 : याच महिन्याच्या अखेरीस म्हणजेत 28 जुलैपासून ते 8 ऑगस्टपर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धा इंग्लंडच्या बर्मिंघहमध्ये पार पडणार आहेत. यंदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेट खेळालाही जागा देण्यात आली असून यासाठी संघ निवडल्यानंतर कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) जबाबदारी देण्यात आली आहे. या स्पर्धेबद्दल बोलताना हरमनप्रीतने नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

कौर म्हणाली,“ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्पर्धेत आम्ही पदकांसाठी खेळत आहोत. जर मी स्वत:बद्दल बोलले, तर आम्ही अशा स्पर्धा पाहत आम्ही मोठे झालो आहोत आणि आम्हालाही संधी मिळत आहे याचा मला आनंद आहे, आम्ही देखील या मोठ्या स्पर्धेचा भाग होऊ.'' "मला वाटते की जर आम्हाला अशाच संधी मिळत राहिल्या तर भविष्यात आमच्यासाठी आणि संघासाठी हे खूप चांगले असेल."  कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाचं नेतृत्त्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) करणार असून स्मृती मंधाना (Smriti Mandhana) उपकर्णधार असणार आहे. भारताने एकूण 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आयसीसीसह बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन दिली. तर नेमका संघ कसा आहे, यावरही नजर फिरवू....

भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक),  यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा,  स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा  रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल. 

सामना तारीख ठिकाण
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 29 जुलै, 2022 एजबेस्टन, बर्मिगहम, इंग्लंड
भारत विरुद्ध पाकिस्तान 31 जुलै, 2022 एजबेस्टन, बर्मिगहम, इंग्लंड
भारत विरुद्ध बारबाडोस 3 ऑगस्ट, 2022 एजबेस्टन, बर्मिगहम, इंग्लंड

हे देखील वाचा-