ICC Media Rights : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून (ICC) आगामी वर्षांच्या मीडिया राईट्सबद्दल मोठं अपडेट समोर आणलं आहे. 2024 वर्षीच्या विविध आयसीसी टूर्नामेंटसंबधीच्या मीडिया राईट्सबद्दल माहिती देताना पुरुष आणि महिला स्पर्धांसाठीचे मीडिया राईट्स पहिल्यांदाच वेगवेगळे विकले जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये 16 पुरुष गटाच्या स्पर्धा ज्या पुढील 8 वर्षांत पार पडतील. तर सहा महिला गटाच्या स्पर्धा ज्या पुढील 6 वर्षांत पार पडतील यासाठी बोली लावली जाणार आहे. यावेळी पुरुषांच्या 362 तर महिलांच्या 103 सामन्यांचा यात समावेश आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे पहिल्यांदाच भारतीय बाजारात पुरुष आणि महिला क्रिकेट स्पर्धांसाठीचे मीडिया राईट्स वेगवेगळे विकले जाणार आहेत.



आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार या मीडिया राईट्सना विकत घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये पुरुष स्पर्धांसाठी चार वर्षांसाठीची बोली जमा करावी लागणार आहे. याशिवाय थेट आठ वर्षांसाठीची बोली लावण्याचा पर्याय देखील बोली लावणाऱ्यांकडे असणार आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ एलार्डिस यांनी दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितलं की,"आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. ही मीडिया राईट्स घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. कोट्यवधी चाहते जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आवडत्या खेळाडूंना आयसीसीच्या मानाच्या ट्रॉफीसाठी खेळताना पाहायला आवडतं. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सदेखील या स्पर्धांत अधिक इंटरेस्ट घेताना दिसतात.''  


आयपीएल मीडिया राईट्सची 48 हजार कोटींना विक्री


क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी आयपीएल म्हणजे एखाद्या उत्सवाप्रमाणे असते. त्यामुळे हे सामने पाहण्यासाठी कोट्यवधी प्रेक्षकांची उत्सुक असतात. ज्यामुळे या सामन्यांचे प्रक्षेपण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटींना विकले गेले. पण यावेळी एक खास गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे यंदा डिजीटल राईट्स आणि टीव्ही राईट्सच्या विक्रीमध्ये फार फरक दिसून आला नाही. 23 हजार 575 कोटींना टीव्ही राईट्स विकले गेले असले तर डिजीटल राईट्सची विक्री 20 हजार 500 कोटींना झाली. यावेळी टीव्हीसाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले यासाठी त्यांनी 23 हजार 575 कोटी रुपये मोजले. तर डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क 20 हजार 500 कोटींना वायकॉम 18 कंपनीला विकले गेले आहेत. 


हे देखील वाचा-