Dinesh karthik breaks MS Dhoni Record: भारत दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात काल चौथा टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं भारतीय संघासाठी 55 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दरम्यान, अर्धशतकीय कामगिरीसह दिनेश कार्तिकनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढलाय. 

Continues below advertisement

दिनेश कार्तिकनं धोनीचा विक्रम मोडलानाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं एकेकाळी 40 धावांवर तीन विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर हार्दिक पांड्याने कर्णधार ऋषभ पंतसह चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूत 41 धावांची आणि अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकसोबत पाचव्या विकेटसाठी 33 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. या सामन्यात दिनेश कार्तिकनं त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं. तसेच सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कार्तिकनं 55 धावा करत धोनीचा खास विक्रम मोडीत काढला. धोनीनं टी-20  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 52 धावांची खेळी केली होती. 

तब्बल 16 वर्षानंतर दिनेश कार्तिकचं टी-20 मध्ये अर्धशतककार्तिक भारताच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा (1 डिसेंबर 2006) भाग होता. त्यानं जोहान्सबर्गमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली होती. पण 16 वर्षांनंतर कार्तिकने पहिले आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकनं 27 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता.

Continues below advertisement

आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी दिनेश कार्तिकने 2022 आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. आयपीएलमधील विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर कार्तिकनं पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केलं. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकनं 184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. ज्यामुळं भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली. 

हे देखील वाचा-