(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : एकदिवसीय संघात केएल राहुलला जागा मिळणार? मधल्या फळीतील त्याची आकडेवारी आहे जबरदस्त
IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळवला जाणार असून भारतीय संघात कोणा-कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागेल.
IND vs AUS, ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) भारत (Team India) आज वानखेडेवर पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. मालिकेतील हा पहिलाच सामना असून भारतीय संघात कोणा-कोणाला संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष्य आहे. अशात मागील काही काळापासून फॉर्मात नसलेल्या केएल राहुलच्या (KL rahul) प्लेईंग-11 (Team india Playing 11) मध्ये स्थान मिळण्याबाबत ही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तो बऱ्याच दिवसांपासून ऑफ फॉर्म आहे. त्यामुळेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्येही त्याला प्लेईंग-11 मधून बाहेर ठेवण्यात आले होते.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खराब फॉर्ममुळे केएल राहुलला टीम इंडियाचे उपकर्णधारपदही गमवावे लागले आहे. त्याला टी-20 संघातून वगळावे लागले. आता एकदिवसीय सामन्यांमध्ये (ODI Cricket) त्याच्याकडे फक्त मधल्या फळीत फलंदाजीची आशा आहे. इथेही तो अपयशी ठरला तर या खेळाडूच्या अडचणी वाढू शकतात. कारण टीम इंडियाकडे केएल राहुलसाठी अनेक पर्याय आहेत.
पाचव्या नंबरवर फलंदाजी करताना केएल राहुलचे आकडे जबरदस्त
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) आजच्या वनडे सामन्यात केएल राहुलचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्याला ओपनिंगऐवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते. सलामीवीर म्हणून तो सतत फ्लॉप होत असतो पण पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचे आकडे उत्कृष्ट आहेत. केएल राहुलने आतापर्यंत 16 डावांमध्ये टीम इंडियासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. येथे त्याने 50.61 च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि 102.17 च्या स्ट्राइक रेटने 658 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
केएल राहुलचा एकदिवसीय रेकॉर्ड
केएल राहुलने जून 2016 मध्ये भारतीय संघासाठी वनडे पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1870 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 44.52 आणि स्ट्राईक रेट 87.34 होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 5 शतकं आणि 12 अर्धशतकं केली आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
हे देखील वाचा-