Team India No Bus Parade : रोहित मुंबईत तर गंभीर दिल्लीत! 12 वर्षानंतर ट्रॉफी जिंकली तरी टीम इंडियाचे नाही 'ग्रँड वेलकम', काय कारण?
India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू आपल्या शहरांमध्ये रवाना झाले आहे.

Team India Win Champions Trophy 2025 Bus Parade : 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू आपल्या शहरांमध्ये रवाना झाले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 10 मार्च रोजी मुंबईत परतला. दरम्यान, प्रशिक्षक गौतम गंभीर दिल्लीला पोहोचले. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच मोठी आयसीसी स्पर्धा आहे. 12 वर्षानंतर ट्रॉफी जिंकली तरी टीम इंडियाचे 'ग्रँड वेलकम' झाले नाही, आता या मागचे कारण समोर आले आहे.
जेव्हा भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा संपूर्ण संघाचे मायदेशी परतल्यावर भव्य स्वागत करण्यात आले आणि बस परेड देखील झाली. एकीकडे, 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तरीही बस परेडची अनुपस्थिती मोठे प्रश्न उपस्थित करत आहे.
View this post on Instagram
बस परेड का होणार नाही?
बस परेड न होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे आयपीएल 2025 काही दिवसांत सुरू होणार आहे. आयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे, पहिला सामना कोलकातामध्ये केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या तारखेपासून आणि आयपीएलच्या सुरुवातीपर्यंत खूप कमी दिवसांचा फरक आहे. अशा परिस्थितीत, सर्व खेळाडू आपापल्या आयपीएल संघांच्या प्रशिक्षण शिबिरात सामील होण्यापूर्वी काही दिवस विश्रांती घेतील.
टी-20 वर्ल्ड कपनंतर का झाले भव्य स्वागत?
2007 मध्ये भारताने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर, टीम इंडियाला पुन्हा ही ट्रॉफी जिंकण्यासाठी 17 वर्षे वाट पाहावी लागली. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. त्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईतील मरीन ड्राइव्हवर भारतीय संघाची भव्य बस परेड आयोजित करण्यात आली होती.
जर आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आठवला तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 251 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 76 धावा केल्या. त्याच्याशिवाय अक्षर पटेलने 48, केएल राहुलने नाबाद 34 आणि अक्षर पटेलनेही खूप महत्त्वाच्या 29 धावा केल्या. अशाप्रकारे, भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.
हे ही वाचा -





















