Hardik Pandya, IPL 2022: भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराउंडर आणि अहमदाबाद संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या हा मागील काही काळापासून दुखापत आणि फॉर्ममध्ये नसल्याने गोलंदाजी करत नसल्याचं दिसत आहे. पण आता आयपीएल 2022 मध्ये तो गोलंदाजी करेल का? हा प्रश्न अनेकांना पडला असून हार्दिकने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.
हार्दिक पांड्या याआधी 2021 साली झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघातून मैदानात उतरला होता. तेव्हापासून त्याच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न उठवले जात आहेत. दरम्यान त्याला गोलंदाजीवर काम करायचं असल्याने त्याने स्वत: निवडकर्त्यांना त्याला संघात घेऊ नये असं सांगितलं आहे. क्रिकेट वेबसाइट क्रिकबजच्या रिपोर्टमध्ये हार्दीक म्हणाला, "माझ्यासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी कायम एक आव्हान राहिलं आहे. मी कायम गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीने योगदान देत असतो. मी जेव्हा काही काळ केवळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी काही काळ मैदानावर वेळ घालवून अधिक सराव करु इच्छित होतो. मला कायमच नवनवीन आव्हानांशी लढायला आवडतं. मला अंतिम रिझल्ट अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी यंदाही कसून सराव करणार आहे.'' हे असं बोलत हार्दिकने गोलंदाजी करणार असल्याचं जणू स्पष्ट केलं आहे.
हार्दिकसह राशिद आणि शुभमनही अहमदाबादमध्ये
आयपीएलमधील 8 संघानी त्यांचे खेळाडू रिटेन केल्यानंतर लिलावापूर्वी लखनौ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील नव्या संघानाही तीन-तीन खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली. ज्यानंतर लखनौ संघाने केएल राहुल, स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केलं आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. हार्दिककडे अहमदाबाद संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. हार्दिक आणि राशिद खान यांना अहमदाबाद संघाने प्रत्येकी 15-15 कोटी रुपये दिले आहेत. तर शुभमन गिल याला आठ कोटी रुपयांत करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत.
हे ही वाचा -
- IPL 2022 Player Auction List Announced: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 खेळाडूंवर लागणार बोली; कोणत्या संघाकडं किती पैसे शिल्लक? पाहा संपूर्ण यादी
- PKL 2021 Live Streaming: बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्सचा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha