WI vs IND: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं (Rohit Sharma) नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या बॅटीतून चार षटकार निघल्यास तो पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडेल. याशिवाय 57 धावा केल्यास रोहित शर्मा त्याच्या नावावर आणखी एक आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवू शकतो.
सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा तिसरा खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक षटकार मारले आहेत. तसेच आतंराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 473 षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्माकडं शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडण्याची संधी
वेस्ट इंडीजविरुद्ध आज खेळण्यात येणाऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मानं चार षटकार मारल्यास तो शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडेल. शाहिद आफ्रिदीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 476 षटकार लगावले आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फंलदाज ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्यानं आतापर्यंत 553 षटकार लगावले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3500 धावा
रोहित शर्माकडं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3500 धावांचा टप्पा गाठण्याचा संधी आहे. यासाठी रोहित शर्माला 57 धावांची गरज आहे. या कामगिरीनतंर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3500 धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू ठरेल.
भारताची आघाडी
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं वेस्ट इंडीजचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय भारत मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला पराभूत करून वेस्ट इंडीजचा मालिकेत कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरेल.
हे देखील वाचा-