India vs West Indies Live : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली असून यामधील पहिला सामना भारताने तब्बल 68 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता आज भारत या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने आधीच एकदिवसीय मालिका 3-0 च्या फरकाने एकहाती जिंकली. ज्यामुळे टी20 मालिकाही मोठ्या फरकाने जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे. तर आज पार पडणारा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 1 ऑगस्ट रोजी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 8 वाजता सामना सुरु होईल. 7 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
वेस्ट इंडीजविरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
हे देखील वाचा -
- CWG 2022 Live Updates Day 4: वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी दोन पदक मिळण्याची शक्यता
- CWG 2022: कॉमनवेल्थ जलतरण स्पर्धेत भारत इतिहास रचणार? श्रीहरी नटराजची 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनलमध्ये धडक