Jasprit Bumrah Romantic Post: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील महिला सामना भारतानं जिंकलाय. तर, आज दुसरा सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. ज्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) समावेश आहे. ज्यामुळं जसप्रीत बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंच जसप्रीत बुमराहनं त्याची पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केलाय.जसप्रीत बुमराहच्या या फोटोला नेटकरी पसंती दर्शवत आहेत.
जसप्रीत बुमराहनं सोशल त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून संजनासोबतचा एक फोटो शेअर केलाय. तसेच या फोटोला त्यानं बेटर टुगेदर, एव्हरी स्टेप ऑफ द वे'असंही कॅप्शन त्यानं दिलंय.जसप्रीत बुमराहच्या या पोस्टला आतापर्यंत 14 हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केलंय. तर, 300 हून अधिक लोकांनी रीट्वीट केलंय. बुमराहचे चाहते त्याच्या फोटोचं कौतुकही करताना दिसत आहेत.
जसप्रीत बुमराहचं ट्वीट-
जसप्रीत बुमराहला भारतीय क्रिकेट संघाचा कणा मानला जातो. त्यानं आपल्या कारकिर्दीत दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला बऱ्याच सामन्यात विजय मिळवून दिलाय. त्यानं भारतासाठी आतापर्यंत 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्यानं दोन वेळा पाच-पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर, 58 टी-20 सामन्यात 69 विकेट्स घेतले आहेत. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 128 विकेट्सची नोंद आहे. आगामी काळात जसप्रीत बुमराह अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-