WI vs BAN: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश (West Indies vs Bangladesh) यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे.या मालिकेतील पहिला सामना अँटिग्वा (Antigua) येथे खेळला जातोय. या सामन्यादरम्यान तमिम इक्बालनं (Tamim Iqbal) एका खास विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाच हजार धावांचा टप्पा गाठलाय. अशी कामगिरी करणारा तो दुसरा बांग्लादेशचा खेळाडू ठरलाय. तसेच बांगलादेशसाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीतही तो दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. मात्र, या कसोटी सामन्यात तो केवळ 29 धावा करून बाद झालाय. 


तमिम इक्बालची कसोची कारकीर्द
तमिमनं आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 68 कसोटी सामन्यांच्या 129 डावांमध्ये 5 हजार 10 धावा केल्या आहेत. बांगलादेशसाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. ज्यात 10 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 209 धावा आहे. बांगलादेशकडून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम मुशफिकुर रहीमच्या नावावर आहे. त्यानं 82 सामन्यात 5 हजार 235 धावा केल्या आहेत. यादरम्यान रहीमनं 9 शतके आणि 25 अर्धशतके झळकावलीत.


ट्वीट-



शकीब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर
बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शकीब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 113 डावात 4 हजार 140 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं पाच शतके आणि 27 अर्धशतकं केली आहेत. त्यानंतर  3 हजार 525 धावा करणारा मोमिनुल हक या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 


हे देखील वाचा-