Hardik Pandya captain : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळत असून या मालिकेनंतर लगेचच आयर्लंडच्या दौऱ्यावर (India Squad for Ireland Tour) दोन टी20 सामने खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा करत कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) निवडलं. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली संघ आयर्लंडला जाणार असून यावेळी हेड कोच म्हणूनही राहुल द्रविड नाही तर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) संघासोबत असेल. 1 जुलै रोजीच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी राहुल द्रविडही दिग्गज खेळाडूंसोबत व्यस्त असणार असल्याने लक्ष्मण संघासोबत असणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांसाठी भारतीय संघ इंग्लंडला जाणार असून यावेळी राहुल द्रविडसोबत बॅटिंग कोच विक्रम राठौड, बोलिंग कोच पारस म्हांब्रे आणि फील्डिंग कोच टी दिलीप हे देखील इंग्लंडला जाणार आहेत. त्यामुळे लक्ष्मणसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) कोच सीतांशु कोटक, साईराज बहुतुले आणि मुनीश बाली हे सोबत असू शकतात. आयर्लंडविरुद्ध भारत केवळ दोन टी20 सामने खेळणार असला तरी विश्वचषकासाठी संघबांधणीकरता हे सामने महत्त्वपूर्ण असणार आहेत.
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 26 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
दुसरा टी20 सामना | 28 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
हे देखील वाचा-