Bangladesh tour of West Indies: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना अँटिग्वा (Antigua) येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर (Sir Vivian Richards Stadium) खेळला जातोय. या सामन्यात भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या संघानं सामना आपल्या बाजुनं झुकवला. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडीजच्या संघाला फक्त 35 धावांची आवश्यकता आहे. बांगलादेशने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी अवघ्या 84 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजच्या संघानं 3 विकेट्स गमावून 49 धावा केल्या.जर्मेन ब्लॅकवुड (17) सलामीवीर जॉन कॅम्पबेल (28) सोबत क्रीजवर आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोचने मोठी कामगिरी केलीय.
केमार रोचची मायकेल होल्डिंगच्या विक्रमाशी केली
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात केमार रोच भेदक गोलंदाजी केली. त्यानं पाच विकेट्स घेऊन बांगलादेशच्या संघाचं कंबरडं मोडलं. रोचनं कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यानं महान वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंगच्या विक्रमाची बरोबरी केलीय. होल्डिंगनं 60 कसोटीत 249 विकेट घेतल्या आणि आता रॉचनं 72 कसोटीत 249 विकेटचा आकडा गाठलाय.
ट्वीट-
वेस्ट इंडिजसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स
वेस्ट इंडिजसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा रोच सहावा गोलंदाज ठरला आहे. रॉचनं बांगलादेशविरुद्ध सामन्यात 53 धावांत पाच विकेट्स घेतले घेतले. त्याच्या पुढे कोर्टनी वॉल्श (519 विकेट्स), कर्टली अॅम्ब्रोस (405 विकेट्स), माल्कम मार्शल (376 विकेट्स), लान्स गिब्स (309 विकेट्स) आणि जोएल गार्नर (259 विकेट्स) आहेत.
हे देखील वाचा-