SL vs AUS ODI Series: श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेईना. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) दुखापत झालीय. त्यामुळं त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकावं लागलंय. आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन पांढऱ्या चेंडू संघातील हा सातवा खेळाडू आहे, ज्याला दुखापत झाली आहे.


नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल


अॅश्टन अगर साइड स्ट्रेनमुळं संघाबाहेर
अहवालात ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी याच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, "25 वर्षीय डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनला ऑस्ट्रेलिया 'अ' संघातून परत बोलावण्यात आलं आहे. कारण पांढऱ्या चेंडूचा नियमित फिरकीपटू अॅश्टन अगरलाही साइड स्ट्रेन झाला होता. ज्यामुळं त्याला संघातून वगळण्यात आलं होतं."


मिचेश स्टार्कलाही दुखापत
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही आधीच दुखापतग्रस्त आहे. स्टार्क मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांचा भाग बनू शकेल की नाही याबाबत काहीही सांगता येणार नाही. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघानं एक-एक सामना जिंकलाय. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 


ऑस्ट्रेलियाचा संघ:
आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिच मार्श, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, झाय रिचर्डसन, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड


श्रीलंकेचा संघ:
निरोशन डिकवेला, पाथुम निसांका, चारिथ असलंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, जेफ्री वेंडरसे, महेश थेकशाना


हे देखील वाचा-