Neeraj Chopra: फिनलँडमधील कुओर्तने गेम्समध्ये शनिवारी भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रानं हंगामातील पहिलं सुवर्ण जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला. टोकियो ऑलिम्पिक विजेत्यानं 86.69 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकलंय. या कामगिरीसह त्यानं वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सलाही मागं टाकलंय. सामन्यादरम्यान फिनलँडचे हवामान खूपच खराब होते, मात्र सर्व अडथळे पार करत नीरजनं सुवर्णपदकावर भारताची मोहर लावली . या विजयानंतर नीरजनं त्याच्या पुढील मिशनबाबत सांगितलंय.
नीरज चोप्रानं त्याच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केलाय."हवामानासह कठीण परिस्थिती, परंतु, कुओर्तने येथील पहिल्या हंगामात विजय मला आनंद वाटत आहे. मला बरे वाटत आहे आणि 30 तारखेला बॉहॉसगलनमध्ये डायमंड लीग सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. समर्थनासाठी सर्वांचं धन्यवाद!", असंही त्यानं या पोस्टद्वारे म्हटलंय.
नीरज चोप्राची इंस्टाग्राम पोस्ट-
नीरजने 86.69 मीटर फेकून दमदार सुरुवात केली होती, जी त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी पुरेशी होती. मात्र, त्याचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न फाऊल झाला. टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही दुसरी स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यानं पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले आणि स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
हे देखील वाचा-
- भारत इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, धोनी-कोहलीला नाही जमलं, त्या व्रिकमाला गवसणी घालण्याची ऋषभ पंतकडं संधी
- IND vs SA, 5th T20: पाचव्या टी-20 मध्ये उमरान किंवा अर्शदीपला संधी मिळणार? कसा असेल भारताचा संभाव्य संघ?
- Father's Day 2022: कोणी फळं विकली, कोणी रिक्षा चालवली तर कोण इलेक्ट्रिशियन! आज त्यांचीचं मुलं गाजवतायेत क्रिकेटचं मैदान