Shreyas Iyer: भारतीय संघात सध्या धडाकेबाज खेळाडूंची फौजच आहे. युवा फलंदाज दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताला सामन्यांत यश मिळवून देत आहेत. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेत भारताचा श्रेयस अय्यर चांगलाच चमकला. त्याने तीनच्या तीन टी20 सामन्यात अर्धशतकं झळकावली. त्याने ही तीनही अर्धशतकं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ठोकली आहेत. ही जागा मूळात विराट कोहली याची असल्याने आता त्याच्या संघात परतल्यानंतर नेमकं श्रेयसच्या संघातील जागेचं काय होणार? हा प्रश्न समोर आहे. दरम्यान श्रेयसनं स्वत: मात्र विराटच्या जागी खेळणं आवडत असल्याचं सांगितलं आहे.


वेस्टइंडीजविरुद्ध दुसऱ्या टी20 नंतर विराट कोहलीला विश्रांती देण्याकरता संघाबाहेर ठेवण्यात आले. ज्यानंतर अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला लागला. आता श्रेयसनं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. तिसऱ्या सामन्यानंतर श्रेयस म्हणाला,‘‘सध्या संघात सर्वच खेळाडू मॅचविनर आहेत. मलाही सामना शेवटपर्यंत नेऊन जिंकवून देणं आवडतं. पण मला निवडण्याची संधी असल्यास मला तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजी करणं आवडेल. कारण याजागी खेळताना संपूर्ण डावाचं योग्य नियोजन करता येतं. खालच्या फळीत खेळायला आल्यास अधिक चेंडू हातात नसतात.'' 


श्रेयस अय्यरचे सलग तीन अर्धशतक


श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं तीन सामन्यात 204 धावांची उत्कृष्ट खेळी केली. श्रेयसनं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केलीय. या तिन्ही सामन्यात तो नाबाद होता. विराट कोहली संघात परतल्यानंतर श्रेयस अय्यरला पुन्हा खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात येईल. सुर्यकुमार यादवही प्रबळ दावेदार आहे. सूर्यकुमारनं वेस्ट इंडिज विरुद्ध संपलेल्या टी 20 मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केलंय.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha