Shreyas Iyer: मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध (IND Vs SL) खेळण्यात आलेल्या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत त्यानं धावांचा पाऊस पाडला. त्यानं सलग तीन सामन्यात शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. श्रेयसच्या या कामगिरीमुळं टीम मॅनेजमेंटसमोर संघ निवडीचा पेच वाढणार आहे. कारण, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांना संघ व्यवस्थापनानं विश्रांती दिलीय. विराटच्या अनुपस्थित श्रेयस अय्यरनं दमदार कामगिरी करून दाखवलीय. यामुळं विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव संघात परतल्यानंतर श्रेयसनं कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला यावं? यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भाष्य केलंय. 


श्रेयस अय्यरचे सलग तीन अर्धशतक
श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं तीन सामन्यात 204 धावांची उत्कृष्ट खेळी केली. श्रेयसनं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केलीय. या तिन्ही सामन्यात तो नाबाद होता. विराट कोहली संघात परतल्यानंतर श्रेयस अय्यरला पुन्हा खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात येईल. सुर्यकुमार यादवही प्रबळ दावेदार आहे. सूर्यकुमारनं वेस्ट इंडिज विरुद्ध संपलेल्या टी 20 मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केलंय.


सुनील गावस्कर काय म्हणाले? 
सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना श्रेयस अय्यरचं फलंदाजीचं कौतूक केलं. मात्र, त्यावेळी त्यांनी श्रेयस अय्यरच्या फलंदाजी क्रमांकावरून एक समस्या असल्याचं मान्य केलं. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतो. त्याची जागा हलवता येणार नाही. सूर्यकुमारसोबत चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फिट बसू शकतो” असं गावस्करांनी म्हटलंय.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha