IND Vs SL:  श्रीलंकेविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 मालिकेत भारतानं उत्कृष्ट कामगिरी करत मालिका 3-0 नं जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं सलग तिसऱ्यांदा विरोधी संघाला क्लीन स्वीप दिलंय. दरम्यान, टी-20 मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मानं एका व्यक्तीच्या हातात ट्रॉफी सोपवली. ज्यानंतर हा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न क्रिकेट पडलाय. तर, ती व्यक्ती कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात.


श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यातील विजयानंतर रोहित शर्माने ट्रॉफी कोणत्याही खेळाडूला न देता नव्या व्यक्तीकडे सोपवली. त्यांचं नाव जयदेव शाह आहे. त्याची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. ते सध्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. जयदेव हा सौराष्ट्रचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी सचिव आणि क्रिकेटपटू निरंजन शाह यांचा मुलगा आहे.  त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 120 सामने खेळले आहेत. ज्यात 29.91 च्या सरासरीने 5 हजाहर 354 धावा केल्या आहेत. ज्यात 10 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी अ श्रेणी क्रिकेटमध्येही 1000 हून अधिक धावा केल्या आहेत.


श्रीलंकाविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारतानं 6 विकेट्स राखून विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 147 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युरात भारतीय संघानं 16.5 षटकात 147 धावांचं लक्ष्य पूर्ण केलंय. या सामन्यातही श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानं 45 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा सलग 12 वा विजय आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha