PSL 2022 Final: पाकिस्तान सुपर लीगमधील अंतिम सामन्यात मुल्तान सुल्तांसला (Multan Sultans) 42 धावांनी पराभूत करून लाहोर कलंदर्सनं (Lahore Qalandars) पीसीएलच्या ट्राफीवर नाव कोरलं आहे. शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Shah Afridi) नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सनं पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकलीय. या सामन्यात पाकिस्तान माजी खेळाडू मोहम्मद हाफिजनं (Mohammad Hafeez) केलेल्या चमकदार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
मोहम्मद हाफिजची चमकदार कामगिरी
लाहोरच्या विजयात मोहम्मद हाफिजंन मोलाचा वाटा उचललाय. फलंदाजी करण्यासाठी मैदानात आल्यानंतर त्यानं 46 चेंडूवर 69 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करतानाही त्यानं चार षटकात 23 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.
मोहम्मद हाफिजनं संघाचा डाव सावरला
पीसीएलच्या अंतिम सामन्यात लाहोरच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. महत्वाचं म्हणजे, ,सामन्याच्या सुरुवातीला लाहोरच्या संघानं 25 धावांवर 3 विकेट्स गमावली होती. मात्र, मोहम्मद हाफिजनं संघाचा डाव सावरला. त्याला हॅरी ब्रूक (41 धावा) आणि डेव्हिड व्हीज (28 धावा) यांची चांगली साथ मिळाली.
मुल्तान सुल्तांसचा संघ 138 धावांवर ऑलआऊट
लाहोरच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुल्तान सुल्तांसचा घ 138 धावांवर ऑलआऊट झाला. मुल्तानकडून सुशदिल शाहनं सर्वाधिक 32 धावा केल्या. तर, टिम डेव्हिडनं 27 धावा केल्या. लाहोरचा कर्णधार शाहीन आफ्रिदीनं 30 धावा देऊन मुल्तानचे 3 फलंदाजांना माघारी धाडलं
हे देखील वाचा-
- Shreyas Iyer : तीन सामने, तीन अर्धशतकं, श्रेयस अय्यरनं विराटला टाकलं मागे
- IND vs WI, 3rd T20 : श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक, भारताचा 6 विकेट्सनी विजय, श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश
- AUS vs PAK : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha