Anil Kumble On KL Rahul: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी (IPL 2022) आठ फ्रंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय. दरम्यान, प्रत्येक संघानं आपल्या महत्वाच्या खेळाडूंची निवड करून त्यांची यादी बीसीसीआयकडं (BCCI) सोपवली होती. या यादीनुसार, पंजाब किंग्जनं (Panjab Kings) त्यांच्या तीन खेळाडूंना रिटेन केलंय. मात्र, मागील दोन हंगामापासून पंजाबचं नेतृत्व करणाऱ्या केएल राहुला संघानं रिलीज केलंय. केएल राहुलला रिलीज करण्यात आल्यानं पंजाबच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. पंजाबनं त्याला रिलीज का केलं? असाही प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. अखेर पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी यामागचं गुपित उघडलंय.


"फ्रँचायझी केएल राहुलला रिटेन करण्यास इच्छूक होती. परंतु, राहुलनं स्वतः पंजाब किंग्जपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यासदंर्भात पंजाबनं अनेकदा केएल राहुलशी चर्चा केली. केएल राहुलनं पंजाब किंग्जसोबत राहावं अशी आमची इच्छा होती. म्हणूनच आम्ही त्याला दोन वर्षांपूर्वी कर्णधारपद दिलं होतं. तो पंजाब किंग्जच्या कोअर ग्रुपचा भाग असावा, अशीही आमची इच्छा होती. पण राहुलला लिलावात जायचं होते. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो", अनिल कुंबळे यांनी म्हटलंय. 


गतविजेच्या चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनं प्रत्येकी चार खेळाडूंना रिटेन केलंय. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर, पंजाबच्या संघानं फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केलंय. 


आयपीएलच्या पुढील हंगामात समाविष्ट केलेल्या अहमदाबाद आणि लखनौच्या या दोन नवीन संघांना खेळाडू निवडण्याची संधी दिली जाणार आहे. या प्रक्रियेनंतरच आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनचं वेळापत्रक ठरवण्यात येईल. आयपीएलचा पुढील हंगामात दोन नवे संघाची ऍन्ट्री झाल्यानं ही स्पर्धा आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-