IPL 2022 RETENTION : आयपीएल 2022 साठी सर्व संघांनी रिटेन खेळाडूंची यादी जारी केली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट राइडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक चार-चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. हैदराबाद, राजस्थान आणि आरसीबी संघांनी तीन-तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. पंजाबने सर्वात कमी दोन खेळाडूंना रिटेन केलेय. मुंबईने रोहित शर्माला 16 कोटी रुपयांत रिटेन केलं आहे. रोहित शर्माच्या पगारात एक कोटी रुपयांच्या वाढ झाली आहे. गतवर्षी रोहित शर्माला 15 कोटी रुपये मिळाले होते. दुसरीकडे विराट कोहलीला आरसीबीने 15 कोटी रुपयांत रिटेन केलं आहे. गेल्या सत्रात विराटला 17 कोटी रुपये मिळत होते. त्यातुलनेत यंदा दोन कोटी रुपये पगार कमी झालाय. यंदा रोहित शर्माला विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळणार आहे.



चेन्नई सुपरकिंग्ज संघाने रविंद्र जाडेजाला 16 कोटी रुपये तर ऋषभ पंतला दिल्लीने 16 कोटी रुपयात रिटेन केलं आहे. या दोन्ही खेळाडूंचा पगार धोनी-कोहलीपेक्षा जास्त झालाय. चेन्नई संघानं धोनीला 12 कोटी रुपयांत रिटेन केलं आहे. गेल्या हंगामात धोनीचा पगार 15 कोटी रुपये होता. यामध्ये तीन कोटी रुपयांची कपात जाली आहे. जाडेजा आणि पंत यांचा पगार धोनी आणि विराट कोहलीपेक्षा जास्त झालाय. 


सर्वाधिक किंमतीत रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी –


रोहित शर्मा, मुंबई – 16 कोटी रुपये
ऋषभ पंत, दिल्ली – 16 कोटी रुपये
रविंद्र जाडेजा, चेन्नई – 16 कोटी रुपये
विराट कोहली, आरसीबी – 15 कोटी रुपये
केन विल्यमसन, हैदराबाद – 14 कोटी रुपये
संजू सॅमसन, राजस्थान – 14 कोटी रुपये
मयांक अग्रवाल, पंजाब – 12 कोटी रुपये
जसप्रीत बुमराह, मुंबई – 12 कोटी रुपये
अँद्रे रसेल, कोलकाता – 12 कोटी रुपये
एम.एस. धोनी, चेन्नई – 12 कोटी रुपये
ग्लेन मॅक्सवेल, आरसीबी – 11 कोटी रुपये
जोस बटलर, राजस्थान – 10 कोटी रुपये


संबधित बातम्या :


IPL Retention 2022 : पंजाबनं राहुलला तर मुंबईनं हार्दिकला सोडलं; पाहा आठ संघातील रिलिज खेळाडूंची यादी
IPL Retention Updates: तुमच्या आवडत्या फ्रेंचायझीनं कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन? घ्या जाणून