T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला दाखल झालाय. या स्पर्धेत टीम इडियानं त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभवाची धुळ चारत टी-20 विश्वचषकाची सुरुवात गोड केलीय. दरम्यान, भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेली मिस्ट्री गर्ल राजलक्ष्मी आरोराच्या (Rajalakshmi Arora) नावाची चर्चा सुरु झालीय. तिचे टीम इंडियासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारतानं सराव सामने खेळायला सुरुवात केलीय. टीम इंडियासोबत 16 सदस्यांचा स्टाफही ऑस्ट्रेलियात पोहचलाय. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सहाय्यक प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफची ऑस्ट्रेलियात आहेत. या सर्वांच्या संघात वेगवेगळ्या भूमिका आहेत. दरम्यान, भारताच्या 16 सदस्यीय स्टाफमध्ये राजलक्ष्मी आरोरा हिचाही समावेश आहे, जी टीम इंडियासोबत प्रवास करत आहे.


इन्स्टाग्राम-






 


राजलक्ष्मी आरोरा कोण आहे?
राजलक्ष्मी अरोराचा टीम इंडियाच्या बॅकरूम स्टाफमध्ये समावेश आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत फिरत आहे. राजलक्ष्मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळात सीनियर मीडिया प्रोड्यूसर आहे. ती भारतीय संघ, खेळाडू आणि बोर्ड अधिकारी आणि चाहते यांच्यातील नातं दृढ करण्याचं काम करते.


राजलक्ष्मी आरोराची पार्श्वभूमी
राजलक्ष्मीनं तिच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात कंटेंट रायटर म्हणून केली. ती 2015 पासून बीसीसीआय सोशल मीडिया मॅनेजर म्हणून रुजू झाली. सध्या ती सीनियर मीडिया प्रोड्यूसर म्हणून काम पाहतेय. राजलक्ष्मीनं पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमधून शिक्षण घेतलंय. येथूनच तिनं मीडियाची डिग्री प्राप्त केली. रिव्हरडेल हायस्कूलमध्ये तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. शालेय जीवनात ती बास्केटबॉल संघ आणि नेमबाजी संघाचा देखील एक भाग होती.


आयपीएलमध्येही बजावलीय महत्वाची भूमिका
राजलक्ष्मीची 2019 मध्ये बीसीसीआयच्या चार सदस्यीय अंतर्गत समितीची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ती मंडळाशी जोडली गेली. त्यांनी यापूर्वी बोर्डाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या प्रमुख म्हणूनही तिनं काम केलंय. यादरम्यान ती भारतीय खेळाडूंवरील गैरवर्तन आणि भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर लक्ष ठेवायची. मात्र, आता तिच्यावर सिनिअर मीडिया प्रोड्युसरची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याशिवाय, भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या अनेक हंगामात मीडिया मॅनेजर म्हणूनही दिसली.


हे देखील वाचा-