Australia ODI Captain: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आरोन फिंचनं (Aaron Finch) काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केलं. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार? याची क्रिकेटविश्वात चर्चा रंगली होती. याचदरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) कसोटी कर्णधार पॅट कमिन्सची (Pat Cummins) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड केलीय. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा 27वा कर्णधार असेल, जो भारतात 2023 मध्ये रंगणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकात (ICC ODI World Cup 2023) ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व करेल.


ट्वीट-






 


पॅट कमिन्सची मोठी प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच पॅट कमिन्स म्हणाला की, फिंचच्या नेतृत्वाखाली मी क्रिकेट पुरेसा आनंद लुटलाय. तसेच त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या एकदिवसीय संघात भरपूर अनुभव आणि प्रतिभा आहे.


पॅट कमिन्सच्या नेतृत्वात आगामी विश्वचषक खेळणार
भारतात 2013 मध्ये रंगणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकात पॅट कमिन्स एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी एक आदर्श पर्याय आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून पॅटने चांगली कामगिरी केलीय. ज्यामुळं त्याच्याकडं एकदिवसीय संघाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले.


पॅट कमिन्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
पॅट कमिन्सनं 43 कसोटी, 68 एकदिवसीय आणि 42 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय.कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 199 विकेट्सची नोंद आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 112 विकेट्स घतेल्या. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला 49 विकेट्स मिळवल्या आहेत. 


आरोन फिंचची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंचची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत होती. या दबावामुळं त्याला एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. फिंचनं 11 सप्टेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.या सामन्यात त्याच्या चाहत्यांची निराशा केली. त्याच्या शेवटच्या सामन्यातही फिंचची बॅट चालली नाही. तो 13 चेंडूत 5 धावा काढून टीम साऊथीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. 


हे देखील वाचा-