IND vs BRA, Fifa U-17 Women's World Cup 2022: भारतात (Team India) सुरु असलेल्या फिफा महिला अंडर-17 फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. या स्पर्धेतील गट सामन्यात भारताला एकही सामना जिंकता आला नाही. एवढेच नव्हेतर संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. ब्राझीलविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या अखेरच्या गट सामन्यात (India vs Brazil) भारताला 5-0 नं पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारताचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.


ट्वीट-






 


सुरुवातीपासूनच ब्राझीलनं सामन्यावर वर्चस्व राखलं
भारताविरुद्ध गट सामन्यात ब्राझीलनं सुरुवातीपासूनचं वर्चस्व राखलं.ब्राझीलनं अधिक वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवला. भारताला गोलच्या दिशेनं एकच शॉट मारता आला. पण ब्राझीलनं डझनाहून अधिक शॉट मारले. आपल्या वेग आणि क्षमतेनं भारतीय बचावफळीला सतत अडचणीत आणणाऱ्या अॅलिननं ब्राझीलसाठी दोन गोल केले. तिनं 40व्या आणि 51व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय, बदली खेळाडू लॉरानंही दोन गोल केले. तिनं 86व्या आणि 93व्या मिनिटाला गोल केलं.


भारताची निराशाजनक कामगिरी
फिफा महिला अंडर-17 फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या 'अ' गटात भारताचा सर्वप्रथम सामना बलाढ्य संघ अमेरिकाशी झाला. या सामन्यात भारताला 8-0 नं पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मोरोक्कोविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताच्या पदरात निराशा पडली. हा सामना मोरोक्कोनं 3-0 नं जिंकला. त्यानंतर ब्राझीलनंही अखेरच्या गट सामन्यात भारताला 5-0 अशी धुळ चारली.अशा प्रकारे भारतीय संघ आपल्या गटात शेवटच्या स्थानावर राहिला. या गटातून ब्राझील आणि अमेरिका उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. अ गटातील दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने मोरोक्कोचा 4-0 असा पराभव केला.  ब्राझील आणि अमेरिकानं या स्पर्धेत प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकले आहेत. तर, 14 ऑक्टोबरला अमेरिका आणि ब्राझील यांच्यातील सामना 1-1 नं बरोबरीत सुटला.


हे देखील वाचा-