India vs Australia 1st T20 : टी20 क्रिकेटमधील दोन अव्वल दर्जाचे संघ असणारे भारत आणि ऑस्ट्रेलिया आजपासून तीन टी20 सामन्यांची मालिका खेळत आहेत. आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे 26 ऑक्टोबरपासून रंगणार असल्याने या स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी ही मालिका एकप्रकारची रंगीत तालिम असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ (Team Australia) भारतात सामने खेळण्यासाठी आला असून आज (20 सप्टेंबर) ते 25 सप्टेंबर दरम्यान हे सामने रंगणार आहेत.  तर आजचा कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊ... 

कधी आहे सामना?

आज अर्थात 20 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल.  

कुठे आहे सामना?

हा सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर. 

ऑस्ट्रेलिया संघ -

आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 20/09/2022 ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
दुसरा टी-20 सामना 23/09/2022 विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र
तिसरा टी-20 सामना 25/09/2022 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद

हे देखील वाचा-