टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 16 व्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) ऐकमेकांशी भिडणार आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर (Dubai International Stadium) हा सामना पार पडणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करणार आहे. तर, पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी बाबर आझम (Babar Azam) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावला नाही. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, विश्वचषकात भारताविरुद्ध सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. दरम्यान, दुबईमध्ये होणाऱ्या आजच्या सामन्यामध्ये पिचची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आज संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. दुबईच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. यातच दुबईतून क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची माहिती समोर आहे. दुबईत संध्याकाळी स्वच्छ हवामान असून पावसाची कोणतीही शक्यता नाही. तसेच क्रिकेटसाठी अगदी उत्तम हवामान आहे.


गेल्या काही वर्षांचा विक्रम पाहिलात तर, दुबईतील काही पीच स्लो आहेत. तसेच काही पीचवर वेगवान गोलंदाजाला मदत मिळते. आयपीएलमधील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, येथे वेगवान गोलंदाज जास्त यशस्वी ठरले आहेत. विश्वचषकातील या सामन्यामधील टॉसकडे सर्वांच लक्ष लागले आहे. यूएईमध्ये सतत हवामान बदलत असते. या ठिकाणी संध्याकाळी दव पडतात. यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 77 टक्के सामने जिंकले आहेत. यामुळे टॉस जिंकून विराट कोहली प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. 


भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण 12 वेळा टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात आमने सामने आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवला आलेला नाही. या 12 सामन्यांपैकी 5 सामने टी-20 विश्वचषकातील, तर 7 सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत. भारत आजच्या सामन्यात विजयाची परंपरा कायम ठेवेल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहेत.


संबंधित बातम्या-