T20 World Cup 2021, IND vs PAK :आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होत आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 11 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.


T20 World Cup, India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्याआधी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला....


विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर त्याला महासंग्रामाचे रुप धारण होते. दरम्यान, विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही. विश्वचषकात भारताने पाकिस्तानाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. हा विक्रम कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होते? याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. 


पाकिस्तानात कोहलीपेक्षा 'या' भारतीय खेळाडूला जास्त पसंती, शोएब अख्तरचा खुलासा


एकदिवसीय विश्वचषक 1992 ग्रुप स्टेज मॅच, सिडनी


भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा 1992 मध्ये एकमेकांच्या समोर आले होते. या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी भारतीय संघाने सात विकेट्स गमावून 216 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानच्या संघाने भारताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 173 धावांवर ऑलआऊट करून 43 धावांनी विजय मिळवला होता. मोहम्मद अजहरुद्दीनच्या नेतृत्वात हा सामना खेळण्यात आला होता. 


टी-20 विश्वचषक 2007  ग्रुप स्टेज मॅच, डरबन


पहिल्या टी-20 विश्वचषकात ग्रुपस्टेजमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी हा सामना टाय झाला होता. या सामन्यात सुपर ओव्हर पाहायला मिळाली. ज्यात भारतीय संघाने 3-0 बॉल आऊट करून हा सामना जिंकला होता. या सामन्यात भारताकडून रॉबिन उथप्पा (50), महेंद्रसिंह धोनी (33) आणि इरफान पठाण (20) यांच्या खेळीच्या जोरावर संघाने सन्मानजनक स्कोर केला होता. 


एकदिवसीय विश्वचषक 1996 क्वार्टर फायनल मॅच, बंगळरू


भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1996मध्ये क्वार्टर फायनल सामना खेळण्यात आला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात नवज्योत सिद्धूने सर्वाधिक 93 धावा केल्या. तर, अजय जाडेजाने 45 धावा केल्या. भारताने 8 गडी गमावून 287 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमदने 56 धावांत 2 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला 248 धावा करू शकला. 


टी-20 विश्वचषक 2007 फायनल- 


पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडला होता. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. या सामन्यात केवळ 5 धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ 152 वर ऑलआऊट झाला. या सामन्यात मिस्बाह-उल-हकने सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अखेरच्या षटकात जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर त्याने श्रीशांतला झेल दिला. 


टी-20 विश्वचषक 2021 च्या सराव सामन्यात भारताकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध सात विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभूत केले. भारताकडून पुढेही अशीच कामगिरी पाहायला मिळेल? अशी अपेक्षा केली जात आहे.