एक्स्प्लोर

टाईम आऊटचा तो नियम नेमका काय ? ज्यामुळे एकही चेंडू न खेळता मॅथ्यूज बाद

What is timed out? Explaining the rules बांगलादेशने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध टाइम आउटची अपील केली. मॅथ्यूजला स्ट्राईक घ्यायला वेळ लागली, त्यामुळे शाकीबने पंचांकडे दाद मागितली.

Timed Out Rule:  दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर सुरु असलेल्या श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) सामन्यात ड्रामा पाहायला मिळाला. नागीन डान्समुळे दोन्ही संघामध्ये आधीच तू तू मैं मैं आहे. त्यातच दिल्लीत बांगलादेशने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध टाइम आउटची अपील केली. मॅथ्यूजला स्ट्राईक घ्यायला वेळ लागली, त्यामुळे शाकीबने पंचांकडे दाद मागितली. नियमांनुसार, पंचांनी अँजलो मॅथ्यूजला बाद दिले. पण, शाकीबच्या या कृतीवर क्रीडा जगतातून टीका होत आहे. खिलाडूवृत्ती दाखवून शाकीबने अपील माघारी घ्यायला हवी होती, असा सूर अनेकांनी घातलाय. 146 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात टाईम आऊटवर एखाद्या खेळाडूला बाद देण्याची ही पहिलीच वेळ होय. पण हा नियम काय आहे... याबाबत तुम्हाला माहितेय का ? What is timed out? Explaining the rules

नेमकं काय झाले... 

सदर समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँझलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने फलंदाजीसाठी स्ट्राईक घेतली. पण स्ट्राईक घेत असताना हेल्मेट खराब झाले. त्यामुळे मॅथ्यूजने दुसरे हेल्मेट मागवले. पण या सर्व घटनेला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे शाकीबने पंचाकडे आऊटची दाद मागितली. त्यानंतर मैदानावर थोडावेळ राडा झाला. अँजलो मॅथ्यूजने शाकीबकडे अपील खरेच केली का? असा सवालही केला. पंचाशी बातचीतही केली. पण नियमांनुसार, पंचांनी मॅथ्यूजला बाद दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी टाईमआऊट झाल्यामुळे कुणालाही बाद दिलेले नाही. अँजलो मॅथ्यूज असा बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरलाय. 

टाइम आऊटचा नेमका नियम काय ? 

क्रिकेटचे नियम करणारी संस्था MCC नुसार, फलंदाज बाद झाला अथवा राटायर झाल्यानंतर पुढील फलंदाजाने तीन मिनिटांत चेंडूचा सामना करायला हवा. अन्यथा त्या फलंदाजाला बाद दिले जाईल. दरम्यान, स्टार स्पोर्ट्सनुसार, विश्वचषकासाठी या नियमांत थोडा बदल करण्यात आला आहे. तीन मिनिटांचा वेळ दोन मिनिटे करण्यात आला आहे. टाईम आऊटवर बाद झालेल्या खेळाडूची विकेट गोलंदाजाच्या नावावर जमा होत नाही.

सोशल मीडियावर बांगलादेश अन् शाकीबवर टीका - 

अँजलो मॅथ्यूजला बाद दिल्यानंतर सोशल मीडियवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. समालोचकांनीही हे खिलाडूवृत्ती नसल्याची प्रतिक्रिया दिली. मॅथ्यूजने जाणूनबुजून उशीर केला नव्हता. त्यामुळे शाकीबने आपली अपील माघारी घ्यायला हवी होती, असे समालोचकांनी म्हटलेय.  सोशल मीडियावर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या समर्थकांमध्ये राडा सुरु झालाय. दोन्ही देशांचे समर्थक भीडले आहेत.

शाकीबने खिलाडूवृत्ती दाखवायला हवी होती -

शाकिबने पंचांकडे बादची अपील केल्यानंतर अँजलो मॅथ्यूजने तुटलेले हेल्मेट अंपायर आणि शाकिबलाही दाखवले. हेल्मेट तुटल्यामुळे पहिला चेंडू खेळण्यास वेळ लागला. पण शाकिबने आपला निर्णय बदलला नाही. त्यामुळे पंचांना बाद द्यावे लागले. अशाप्रकारे मॅथ्यूज हा टाईमआऊट होणारा पहिला फलंदाज ठरला. हेल्मेट तुटल्यामुळे मॅथ्यूजला वेळ लागला, त्याने जाणूनबुजून उशीर केला नव्हता. त्यामुळे शाकीबने खिलाडूवृत्ती दाखवून अपील माघारी घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
Embed widget