West Indies T20 team : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पुढील महिन्यांपासून भारतीय भूमीत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान वेस्ट इंडीजनं टी 20 सामन्यांसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा नुकतीच केली आहे. पण या संघात धाकड खेळाडू शिम्रॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याला वगळण्यात आलं आहे. अखेरच्या फळीतील अप्रतिम फलंदाज असणारा शिम्रॉन क्षेत्ररक्षणातही उत्तम आहे. पण या महत्त्वाच्या मालिकेत त्याला वगळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या टी20 संघात पोलार्डच्या खांद्यावर वेस्ट इंडीज संघाची मदार असणार आहे. तर, निकोलस पूरन उप-कर्णधार असेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, त्यानंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आमनेसामने येतील. सर्व एकदिवसीय सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक6 फ्रेबुवारी 2022- अहमदाबाद9 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद12 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद
टी-20 मालिकेचं वेळापत्रक15 फ्रेब्रुवारी 2022- कोलकाता18 फेब्रुवारी 2022- कोलकाता20 फेब्रुवारी 2022- कोलकाता
वेस्ट इंडीज टी-20 संघ-
पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॅमनिक डेरेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स हेडन वॉल्स.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
हे देखील वाचा-
- आम्ही मासांहार करुन वाघाप्रमाणे झालो आहे, म्हणून आमच्याकडे वेगवान गोलंदाज अधिक, शोएब अख्तरचा अजब दावा
- Happy Birthday Ruturaj Gaikwad: आयपीएलच्या आठव्या हंगामात ऋतुराजची मोठी कामगिरी, विराट आणि धोनीलाही टाकलं मागे
- IND vs WI, T20 Series: भारतासमोर वेस्ट इंडीजच्या 'या' फलंदाजांचं मोठ आव्हान, इंग्लंडविरुद्ध मालिकेत पाडलाय धावांचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha