कराची : पाकिस्तान क्रिकेट संघ म्हटलं की सर्वात आधी डोक्यात त्यांचे वेगवान गोलंदाज (Fast Bowlers of Pakistan) येतात. शोएब अख्तर, वासिम अक्रम, वकार युनूस यांच्यापासून हसन अली, शाहिन आफ्रिदी या युवा खेळाडूंपर्यत अनेक वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. दरम्यान त्यांच्याकडे असणाऱ्या या वेगवान गोलंदाजांच्या मोठ्या संख्येबाबत माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) अजब दावा केला आहे. पाकिस्तानमधील वातावरण तसंच इथल्या खाण्या-पिण्यामुळे आम्ही अधिक गोलंदाज तयार करु शकतो असं त्याने म्हटलं आहे.
शोएब अख्तर म्हणाला, 'पाकिस्तानमध्ये अधिक वेगवान गोलंदाज असण्यामागे येथील पर्यावरण, आहार हे महत्त्वाचे फॅक्टर आहेत. तसंच आमच्याकडील खेळाडूंमध्ये भरपूर ऊर्जा आहे. तसंच आम्ही खूप साऱ्या प्राण्यांचम मांस खातो त्यामुळे आम्ही प्राण्यांप्रमाणे होऊन वाघासारखं धावू शकतो.'' शोएब अख्तरने ही प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीसोबत एका चर्चेदरम्यान केली आहे. हे दोघांचीही नावं जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये घेतली जातात. नुकतंच या दोघांनी ओमानमध्ये खेळण्यात आलेल्या लेजेंड्स क्रिकट लीगमध्येही सहभाग घेतला होता. ब्रेट ली वर्ल्ड जायंट्स तर शोएब आशिया लायन्सकडून खेळला. या स्पर्धेत वर्ल्ड जायंट्सनी आशिया लायन्सला मात देत ट्रॉफी जिंकली.
'तर सचिनने एक लाख धावा केल्या असत्या'
काही दिवसांपूर्वीच शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “तुम्ही आता वन डे क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूंसह खेळता. तुम्ही नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे सध्या फलंदाजांवर जास्त लक्ष दिलं जात आहे. आता तीन रिव्ह्यूचा नियमही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, सचिन तेंडुलकरच्या काळात हाच नियम असता तर त्याने एक लाखांहून अधिक धावा केल्या असत्या.'
हे देखील वाचा-
- ...तर सचिन तेंडुलकरने 1 लाखांहून अधिक धावा केल्या असत्या, शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- IND Vs WI: विश्वविक्रम! टीम इंडिया खेळणार 1000 वा एकदिवसीय सामना, रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ उतरणार मैदानात
- IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा 'बॅक अप प्लॅन' तयार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha