IND vs WI : येत्या 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडीजविरूद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू अहमदाबादला पोहोचले आहेत. सर्व खेळाडूंनी रविवार आणि सोमवार दरम्यान जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात प्रवेश केला. सर्व खेळाडू तीन दिवस अलगीकरणात राहणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने पीटीआयसोबत बोलताना दिली.   


या मालिकेदरम्यान रोहित शर्मा पहिल्यांदाच भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित कर्णधार असेल. पायाच्या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. 


भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने भारतीय संघ शनिवारी अहमदाबादला रवाना झाल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तो विमानात शिखर धवनसोबत बसला असल्याचे या फोटोतून दिसत आहे. फिरकीपटू कुलदीप यादवचे संघात पुनरागमन झाले असून लेगस्पिनर रवी बिश्नोईला प्रथमच संघात स्थान मिळाले आहे.






कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-20 सामने दोनच मैदानांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही टी-20 सामने कोलकात्यात खेळवले जातील.  


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ



रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान


एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
6 फ्रेबुवारी 2022- अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद


टी-20 मालिकेचं वेळापत्रक
15 फ्रेब्रुवारी 2022- कोलकाता
18 फेब्रुवारी 2022- कोलकाता
20 फेब्रुवारी 2022- कोलकाता


 


महत्वाच्या बातम्या