Viral Video: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम लावला. धोनी भलंही भारतीय संघापासून दूर गेला असेल, पण भारतीय खेळाडू त्याच्यापासून दूर जाऊ शकले नाहीत. भारतीय खेळाडू अनेकदा धोनीला भेटतात. अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या टी-20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्यानं धोनीची भेट घेतली. त्यावेळी प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या गाला चष्मा गाण्यावर धोनी आणि हार्दिक पांड्यानं जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बादशाह त्याचं गाणं काला चष्मा गाण्यातील रॅप गातोय. या गाण्यावर धोनी हार्दिक पांड्या डान्स करताना दिसत आहेत. या दोघांसोबत हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याही उपस्थित होता. धोनीचा असा डान्स करतानाचं व्हिडिओ लवकर पाहायला मिळत नाहीत. त्यामुळंच आता त्याच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.


व्हिडिओ- 






 


बीसीसीआय धोनीवर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. धोनीच्या कार्यकाळात भारतीय संघानं क्रिकेटविश्वात नवी उंची गाठलीय. यातच धोनीची पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची तयारी सुरू झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं धोनीला भारतीय संघात कायमस्वरुपी काम करण्यासाठी आमंत्रण पाठवणार आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामानंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात असून बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडू इच्छित नाही. 


महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि  98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 10 हजार 773 धावांची नोंद आहे. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्यानं एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-