IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसानं हजेरी लावलीय. या सामन्यात भारताचा युवा विकेटकिपर आणि फंलदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) संघातून वगळण्यात आलं. त्याच्याऐवजी दीपक हुडाला संघात संधी देण्यात आलीय. ज्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त करत टीम इंडियाच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच बीसीसीआय आणि ऋषभ पंतला ट्रोलही केलं जातंय. 


दरम्यान, संजू सॅमसनला चांगली कामगिरी करूनही प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. संजूनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात 36 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यानं श्रेयस अय्यरसोबत 80 धावांची भागेदारी करत भारताची धावसंख्या 300 च्या पलिकडं घेऊन जाण्यास मदत केली. मात्र, तरीही त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ज्यानंतर चाहते ट्विटरद्वारे संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


खराब कामगिरीनंतरही पंतला संधी
भारताचा युवा विकेटकिपर ऋषभ पंत गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात तो अवघ्या 15 धावा करून माघारी परतला. मात्र, तरीही त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली. पंतच्या शेवटच्या पाच डावांमध्ये 6,3,6,11,15 धावा केल्या आहेत. 2022 मधील त्याची टी-20 कामगिरी पाहता त्यानं यावर्षी 21 डावांत केवळ 21.21 च्या सरासरीनं 364 धावा केल्या आहेत. पंतचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात यावं, अशा मागणींनी जोर धरलाय. 


भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल.


हे देखील वाचा-