Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, एकदिवसीय मालिकेत त्यानं दमदार कामगिरी करत पुनरागमनाचे संकेत दिले होते. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर रोहित शर्माला वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आली. या मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवननं भारतीय संघाचं नेतृत्व केलं. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदाची सुत्रे आपल्या हाती घेणार आहे. मात्र, टी-20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच रोहितचा नेटमध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत रोहित शर्मा उत्तुंग षटकार मारताना दिसत आहे.
नेटमध्ये रोहित शर्माचा दमदार सराव
त्रिनिदादला पोहोचल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये रोहित सरावासाठी मैदानात उतरला नाही. परंतु, त्यानंतर मैदानात दाखल होताच रोहितनं वेस्ट इंडीजविरुद्ध त्याची भूमिका स्पष्ट केलीय. नेटमध्ये रोहित शर्मा त्याचा सिग्नेचर पुल शॉट खेळताना दिसला. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली होती. तसेच कर्णधार रोहित शर्माचीही बॅट शांतच होती.यामुळं यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाकडं पाहता रोहित शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे.
व्हिडिओ-
रोहित शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी महत्वाचा
वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकाद्वारे रोहित शर्माला त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतायला आवडेल. रोहित शर्माचं पुन्हा फॉर्ममध्ये परतणं भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे. रोहित शर्मा सध्या तिन्ही फॉरमेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्यानं चांगली सुरुवात केली. परंतु, त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
हे देखील वाचा-