India vs West Indies 1st T20: भारत आणि  वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून (29 जुलै 2022) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाड रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते? यावर एक नजर टाकुयात. 


कोणकोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?
रविंद्र जाडेजा सध्या गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. दुखापतीमुळं त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्याला मुकावं लागलं होतं. त्याच्या ऐवजी भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आलं होतं. या सामन्यात अक्षरनं 64 धावांची वादळी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंहला संधी मिळू शकते. याशिवाय, अक्षर पटेललाही संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


कधी, कुठे रंगणार टी-20 सामने?
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला टी-20 सामना 29 जुलै 2022 म्हणजेच आज खेळला जाणार आहे. त्यानंत दुसरा टी-20 सामना 1 जुलै आणि तिसरा टी-20 सामना 2 जुलैला खेळला जाईल. हे दोन्ही सामने सेंट किट्स आणि नेव्हिस येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर चौथा (6 ऑगस्ट) आणि पाचवा टी-20 सामना (7 ऑगस्ट) अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे पार पडतील. 


संभाव्य संघ-


भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, दीपक हुड्डा/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन/कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह. 


वेस्ट इंडीज: 
ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, ओबेड मॅककॉय और हेडन वॉल्श जूनियर/अल्जारी जोसेफ.



हे देखील वाचा-