WI vs IND T20 Series: एकदिवसीय मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ टी-20 मालिकेसाठी (West Indies vs India) सज्ज झालाय. भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं (CWI) 16 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. टी-20 मालिकेत निकोलस पूरन वेस्ट इंडीजच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघात बऱ्याच खेळाडूंचं पुनरामन झालय.ज्यात स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर, ओडेन स्मिथ व ओबेद मेकॉय यांचा समावेश आहे. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरणार आहे. 

ट्वीट-

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना  29 जुलै 2022 पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-20 सामना 1 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
तिसरा टी-20 सामना 2 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
चौथा टी-20 सामना 6 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका
पाचवा टी-20 सामना 7 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका

भारताविरुद्ध वेस्ट इंडीजचा टी-20 संघ
निकोलस पूरन (कर्णधार), शामराह ब्रूक्स, ब्रेंडन किंग, कायले मायर्स, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), डोमेनिक ड्रेक्स, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, जेसन होल्डर, ओबेद मेकॉय, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, शिमरन हेटमायर, किमो पॉल, हेडन वॉल्श, डेवॉन थॉमस.

वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)

हे देखील वाचा-