Shahid Afridi Virat Kohli Team India : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला दोन वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेलं नाही. आयपीएल 2022 मध्येही विराट कोहलीची बॅट शांतच होती. फॉर्ममध्ये परतण्यासाठी विराट कोहलीला अनेकांनी सल्लेही दिले. पण पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केलाय. विराट कोहलीच्या अॅटिट्युडवर आफ्रिदीने प्रश्न उपस्थित केलाय. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की, विराट कोहली खूप दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. विराट कोहलीमध्ये आता नंबर एक बनण्याची भूक अथवा जिद्द दिसत नाही.  


दैनिक भास्करमध्ये आलेल्या वृत्तानुसार, आफ्रिदीच्या मते विराट कोहली आता क्रिकेटमध्ये टाईमपास करत आहे. त्यामध्ये नंबरचा एकचा फलंदाज होण्याची जिद्द अथवा भूक दिसत नाही. दहा वर्षांपूर्वीचा आणि आताच्या विराटमध्ये खूप फरक आहे. दरम्यान, खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित कऱणाऱ्याला नुकतेच विराट कोहलीने प्रत्त्युत्तर दिले होते. माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण जगत आहे. माझ्याबाबत कोण काय म्हणतेय, याचा मला काहीही फरक पडत नाही, असे विराट कोहली म्हणाला होता. 


आफ्रिदीने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विराट कोहलीचा फॉर्म त्याच्या क्रिकेटमधील वृत्तीवर अवलंबून आहे. पुन्हा एकदा नंबर एक होण्यासाठी तो प्रयत्न करत आहे का? की आहे त्या परिस्थितीत तो खूश आहे? विराट कोहलीकडे क्लास आहे, पण तो नंबर एक होण्यास उत्सुक आहे का?, असे शाहिद आफ्रिदी म्हणाला. 


दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली अडीच वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. विराट कोहलीला शतक झळकावता आलेले नाही. आयपीएल 2022 मध्येही विराट कोहलीला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने एक दोन चांगल्या खेळी केल्या. पण त्याला कामगिरीत सातत्या राखता आले नाही. तीन वेळा विराट गोल्डन डकचा शिकार झाला. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 70 शतके झळकावली आहेत. त्याने 101 कसोटी, 260 एकदिवसीय आणि 97 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. विराट कोहलीने कसोटीत 8043 धावा, एकदिवसीय सामन्यात 12311 धावा आणि टी-20 मध्ये 3296 धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीने कसोटीत 27 तर एकदिवसीय सामन्यात 43 शतके झळकावली आहेत.