ENG vs IND : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर आयर्लंडविरुद्ध 26 आणि 28 जूनरोजी दोन टी20 सामने खेळणार आहे. ज्यानंतर इंग्लंडविरुद्ध भारत कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामने खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण संघाचा सलामीवीर आणि महत्त्वाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. अजून याबाबत बीसीसीआयने अधिकृत वक्तव्य जाहीर केलं नसलं तरी जवळपास तो या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. पण याचवेळी राहुलच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज शुभमन गिलसाठी (Shubhman Gill) ही एक सुवर्णसंधी असणार असून त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

शुभमनने याआधी देखील रोहितसोबत सलामीला आल्याचं पाहायाला मिळालं आहे. त्यात यंदा आयपीएल 2022 विजेत्या गुजरात टायटन्स संघाकडूनही शुभमनने चांगली कामगिरी केली. त्याने 16 सामन्यात 483 धावा केल्या. 96 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. याशिवाय सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही तो पाचवा राहिला. दरम्यान या सर्वामुळे रोहितसोबत शुभमनच सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे.

इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

भारतीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

हे देखील वाचा-