ENG vs IND: इतिहास रचण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल झालाय. भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. परंतु, या फोटोंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दिसला नाही. ज्यामुळं चाहते सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. इंग्लंड दौऱ्यात भारतीय पुढे ढकलण्यात आलेल्या सामन्यात व्यतिरिक्त तीन सामन्याची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 

बीसीसीआयनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि केएस भारत दिसत आहेत. परंतु, रोहित शर्मा दिसत नसल्यानं त्याचे चाहते सोशल मीडियावर बीसीसीआयला टॅग करून अनेक प्रश्न विचारत आहेत. 

फोटो-

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारिख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

 

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

भारतीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.